Ad will apear here
Next
‘मिडास ट्रॉफी’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन
परकीय भाषांमधील एकांकिकांचा महोत्सव
पुणे : तेजल क्रिएशन्स, रिआनडॉटआयओ व आयजे कॅटॅलिस्टसतर्फे पुण्यात ‘मिडास ट्रॉफी’ या इंग्रजी व अन्य परकीय भाषांमधील एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या रविवारी,१६ डिसेंबर रोजी भरतनाट्य मंदिर येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे. यामध्ये जर्मन, इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा विविध भाषांमधील एकांकिका विद्यार्थी सादर करतील.

‘मिडास ट्रॉफी’ ही मूळ कल्पना ‘तेजल क्रिएशन्स’च्या ललिता मराठे यांची आहे. विद्यार्थी व परकीय भाषांमध्ये रस असलेल्यांसाठी भाषेमधील आपले कौशल्य आणि सांघिक कार्याद्वारे आत्मविश्वास वाढविण्याकरता एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 

‘मिडास ट्रॉफीचे हे दुसरे वर्ष असून, पहिल्या वर्षी तीन एकांकिकांचा समावेश होता, तर या वर्षी दहा संघ सहभागी होत आहेत’,अशी माहिती रिआनडॉटआयओचे संस्थापक आनंद शिराळकर यांनी दिली.

कार्यक्रमाविषयी 
‘मिडास ट्रॉफी’ एकांकिका स्पर्धा 
स्थळ : भरत नाट्यमंदिर, पुणे 
दिवस व वेळ : रविवार,१६ डिसेंबर, सकाळी नऊ वाजता. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZUIBV
Similar Posts
मिडास ट्रॉफी एकांकिका स्पर्धा उत्साहात पुणे : तेजल क्रिएशन्स, रिआन व आयजे कॅटॅलिस्टस यांच्या वतीने पुण्यात मिडास ट्रॉफी ही परकीय भाषांमधील एकांकिका स्पर्धा नुकतीच भरतनाट्य मंदिर येथे पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या संघांनी जर्मन, इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा अनेक भाषांमध्ये विविध एकांकिका सादर केल्या. तब्बल १० एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले
दाजीकाका गाडगीळ करंडकाची चौथी आवृत्ती जाहीर पुणे : पीएनजी ज्वेलर्सतर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेची चौथी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. हा करंडक दर वर्षी स्वर्गीय दाजीकाका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येतो. दाजीकाका गाडगीळ यांनी नेहमीच कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे. ही मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील राज्यस्तरीय
साय-फाय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी १६ डिसेंबरला पुणे : ‘सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘क्वीक हील फाउंडेशन’ने महाराष्ट्र सायबर सुरक्षा विभाग आणि थिएटर अकादमीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘साय-फाय करंडक २०१८’ या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी १६ डिसेंबर रोजी होणार आहे’, अशी माहिती क्वीक हील टेक्नॉलॉजीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ कैलाश काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language